जिल्हाधिकारी संपूर्ण पैसा दाबून बसले आहेत, त्यामुळे खर्च होत नाहीये...
नागपूर : राज्यात आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. शहर काय आणि ग्रामीण काय, अतिशय विदारक परिस्थिती आहे. आरटीपीसीआर तपासण्यांची स्थिती गंभीर आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक तालुक्यात तपासणी केंद्र स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण त्यांनी काहीही केले नाही आणि आता सर्व भार मेयो आणि मेडिकलवर आला आहे. जिल्हाधिकारी संपूर्ण पैसा दाबून बसले आहेत, असा घणाघाती आरोप माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केला.
#sarkarnama #politics #nagpur
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics